हा ब्लॉग शोधा

Ugachach लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Ugachach लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २९ डिसेंबर, २०१९

रिकामटेकडे भाषांतर उद्योग: We Will Rock You

रिकामटेकडे भाषांतर उद्योग (RBU): we will rock you


एकदा बोर झालं होतं, उगीचंच online टाईमपास करायला घेतला. आमची इंग्रजीची बऱ्यापैकी मारामार आहे, तेव्हा इंग्रजी गाणी वगैरे फारशी समजत नाहीत. डोक्यावरून जातात. ताल, ठेका, संगीत कधी आवडतं, पण शब्द साले घोळ करतात. हिंदी गाण्यांमधलं रॅप पण न कळणाऱ्यांचा पिंड आपला, मग काही उपाय करून अर्थ समजला तरी बरं म्हणून एक शक्कल लढवली. म्हंटलं, गूगलचा घ्यावा फायदा. मग काय सरळ google translate वर जाऊन टाकले इंग्रजी गाण्याचे बोल. आई शप्पथ एकदम बेक्कार हालत झाली. इंग्रजी कळणं राहिलं बाजूला पण हसता हसता वाट लागली. थोडं फार इंग्रजी येतं आणि मराठी पण बऱ्यापैकी जमतं त्यामुळे असले अर्थ असूच शकत नाहीत हे एकदम स्पष्ट होतं. पण यातून एक चांगलं घडलं कि मला टाईमपास करायचा अजून एक मनोरंजक उपाय सापडला. तर हा टाईमपासचा एकदम जालीम उपाय सगळ्यांसाठीच ... 

(मूळ कवीची माफी मागत ) पेश-ए-खिदमत है उस साल का यह लोकप्रिय गीत:

Queen: We will, we will rock you

Buddy, you're a boy, make a big noise
Playing in the street, gonna be a big man someday
You got mud on your face, you big disgrace
Kicking your can all over the place, singin'

We will, we will rock you
We will, we will rock you

Buddy, you're a young man, hard man
Shouting in the street, gonna take on the world someday
You got blood on your face, you big disgrace
Waving your banner all over the place

We will, we will rock you, sing it!
We will, we will rock you, yeah

Buddy, you're an old man, poor man
Pleading with your eyes, gonna get you some peace someday
You got mud on your face, big disgrace
Somebody better put you back into your place, do it!

We will, we will rock you, yeah, yeah, come on
We will, we will rock you, alright, louder!
We will, we will rock you, one more time
We will, we will rock you
Yeah


याचं सरळ सरळ google translate वरचं भाषांतर पुढीलप्रमाणे


बडी, तू मुलगा आहेस, मोठा आवाज कर
रस्त्यावर खेळत आहे, एखाद्या दिवशी मोठा माणूस होईल
तुझ्या चेह on्यावर चिखल झाला, तुझी मोठी बदनामी झाली
आपल्या कॅन ला सर्व ठिकाणी लाथ मारणे, गाणे '

आम्ही करू, आम्ही तुम्हाला दगडफेक करू
(याचा खरंच या महिन्यातल्या भारतीय घटनांशी सर्वस्वी संबंध नाहीये. google translate वरचं खरंच जसंच्या तसं भाषांतर आहे )
आम्ही करू, आम्ही तुम्हाला दगडफेक करू

बडी तू एक तरूण माणूस आहेस
रस्त्यावर ओरडणे, एखाद्या दिवशी जगाचा सामना करायचा आहे
तुझ्या चेह on्यावर रक्त आहे, तुझी मोठी बदनामी झाली आहे
आपले बॅनर सर्वत्र फिरवित आहे

आम्ही करू, आम्ही तुम्हाला रॉक करू, गाणे!
आम्ही, आम्ही तुम्हाला अडकवू, होय

बडी, तू म्हातारा आहेस, गरीब माणूस
डोळ्यांतून भिजत आहे, तुम्हाला कधीतरी शांतता मिळवून देईल
तुझ्या चेह on्यावर चिखल झाला, मोठी बदनामी
कुणीतरी आपल्यास आपल्या जागी परत आणा, तसे करा!

आम्ही करू, आम्ही तुम्हाला अडकवू, होय, होय, चला
आम्ही, आम्ही तुम्हाला जोरात, जोरात!
आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला मागे टाकीन
आम्ही करू, आम्ही तुम्हाला दगडफेक करू
हो

याचा पुरावा म्हणून हा screenshot. ज्यांना अगदीच हवंय त्यांनी स्वतः https://translate.google.co.in/ वर चेक करून पहा!




हसून हसून पोट दुखतंय...
नंतर परत असंच कधीतरी आणि वेगवेगळ्या गाण्यांच्या google translate वरचं अगदी जश्यास-तसं भाषांतर घेऊन पुनः पोष्ट करीन...

बुधवार, ११ डिसेंबर, २०१९

हे भलते अवघड असते


हे भलते अवघड असते

आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण किती जपतो, त्यांचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे ती व्यक्ती दूर जाते तेव्हा मनात येतं. तो पर्यंत आपण त्यांचं असणं गृहीत धरत असतो. नंतर आपण असं वागलो असतो, असं जपलं असतं त्या व्यक्तीला, हे सर्व विचार करून हळहळण्यात काहीच पॉईंट नसतो.

ती प्रिय व्यक्ती सोबत असताना आपल्याला तिची किंमत कदाचित आपल्याला कळत नाही कारण नकळत आपण गृहीत धरलेलं असतं कि आपली व्यक्ती कायम राहणार आपल्या सोबत! आपण काळाच्या ओघात विसरूनच जातो कि हे सर्व शाश्वत नाहीये. इथे शाश्वत असेल तर एकंच गोष्ट... ती म्हणजे मृत्यू !
या मृत्यूचीच सर्वात जास्त भिती वाटते. का ? तर आपण गुंतत जातो, नात्यांमध्ये, माणसांमध्ये, भावनांमध्ये ! संवेदनशील असलं ना तर जरा जास्तंच भिती वाटते मृत्यूची. कदाचित स्वतःच्या नसेलही वाटत, पण जवळची व्यक्ती नसू पण शकते या शक्यतेला सुद्धा मन घाबरतं, भिती वाटते. ही वेळ दुसऱ्यावर असेल तर आपण किती सहजतेनं म्हणून जातो कि "खंबीर रहा", "आम्ही आहोत या दुःखात सोबत", पण खरंच त्या व्यक्तीचं दुःख आपल्याला कळतं ? त्या व्यक्तीने त्याच्या जवळच्या माणसासोबत घालवलेले अनेक क्षण, आनंदाचे म्हणा किंवा दुःखाचे आपल्याला माहीतही नसतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातलं त्या जवळच्या माणसाचं महत्त्व आपल्याला कळण्याच्या पलीकडे असतं. अशा वेळी आपण सोबत आहोत एवढीच सांत्वना देऊ शकतो. या उपर काहीच शक्य नसतं. अवघड असते अशी वेळ...

आयुष्याचं पण विशेष आहे... सुख किंवा दुःख काहीच कायम राहत नाही. काही काळ खूप त्रास होतो आपलं माणूस नसण्याचा, पण हळू हळू सवय होत जाते त्या माणसाच्या नसण्याची. याचा अर्थ आपण त्यांना विसरलो का? तर नक्कीच नाही. कुठेतरी ती व्यक्ती नसण्याची सल मनात राहतेच. इतर गोष्टी, व्यक्ती, प्रेम यांमुळे त्या जखमेवर खपली येते. ती जखम बरी होतेही कदाचीत, पण ह्या जखमा व्रण मात्र सोडून जातात. ह्या जखमा असतात खऱ्या पण खरं कौशल्य त्यात अडकून न पडता पुढे जाण्यात आहे. सोपं तर नक्कीच नसतं, वेळ सुद्धा भरपूर लागतो पण आयुष्याचा Show must go on...  इतरही महत्त्वाच्या व्यक्तींचं प्रेम स्वीकारायचं आणि move on करायचं आयुष्यात. आज ना उद्या आपलं destination पण तेच शाश्वत सत्य आहे, पण त्याचाच विचार करत कुढत जगण्यापेक्षा "आज" चा स्विकार करून मस्तपैकी जगणं जमलं पाहीजे. 

आयुष्य मस्तपैकी जगलंच पाहिजे...




सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९

बातमीप्रेम


कालपरत्वे माणसाने बदलावं, हे तसं पाहता सहसा बरोबरच! पण या हि गोष्टीला अपवाद असतातच... लहानपणी ७ च्या बातम्या ते आजच्या २४ तास चालणाऱ्या वेगवेगळ्या वृत्त वाहिन्या (च्यायला अवघड आहे, त्यापेक्षा न्यूज चॅनल च म्हंटलेलं बरं) सतत पाहणारे काही महाभाग ओळखीचे आहेत. आमच्या शेजारी एक कुटुंब राहत असे. आमचे आजही नेहेमी येणे-जाणे असल्याने त्यांचं वेळापत्रक (TV चं ) छानपैकी माहिती आहे. त्या घरी राहणाऱ्या सर्व मंडळींची एक बेक्कार सवय आहे. त्यांच्या घरी TV दिवसभर चालू असतो. रात्री झोपायची वेळ झाली हेच एकमेव कारण बिचाऱ्या TVला विश्रांती देऊ शकतं. तुम्ही म्हणाल लाईट गेले तर ? त्यांच्याकडे जनरेटर आहे... (जास्त डोकं लावू नका, त्यांचं TV बिल, वीज बिल आम्ही किंवा तुम्ही भरत नसल्याने काही आक्षेप घेऊ शकत नाही.) तर ह्या मंडळींविषयी का लिहिलंय असं वाटणं स्वाभाविक आहे. पण ह्या पोस्टचं शिर्षक बातमीप्रेम असं आहे आणि यांच्या कुटुंबापेक्षा बातमीप्रेमाचं उत्तम उदाहरण असूच शकत नाही कारण हे जे दिवसभर टीव्ही चालतो, त्यावर फक्त आणि फक्त बातम्यांचेच चॅनल अखंड चालतात.

यांच्या कुटुंबातील व्यक्ती घरी आलं रे आलं कि पहिले त्यांचं आवडतं न्यूज चॅनल लावणार आणि (अगदी लहान मुलांना चॉकलेट वगैरे खाऊ मिळाल्यावर जो आनंद, जे समाधान मिळतं त्या लेव्हलच्या समाधानी चेहेऱ्याने) बातम्या पाहणार. मग त्यावरच्या बातम्यांनी पोट भरलं की दुसरा न्यूज चॅनल लावणार. (प्रोग्रामिंग मध्ये लूप ची संकल्पना यांच्यामुळेच आली असावी असं वाटतं. असो... ) हे न्यूज चॅनल वाले पण कमाल असतात राव, एकच बातमी प्रत्येक चॅनल वर वेगवेगळ्या पद्धतीने सादर करतात. ही creativity जबरदस्तच शिकण्यासारखी असते. (इथे मला आमच्या शिक्षणाचे दिवस आठवतात. पेपर लिहिताना आमच्यासारखे (आदरार्थी अनेकवचनी) सामान्य लोक उत्तराची लांबी वाढवण्यासाठी जी creativity वापरायचो ती हीच! फार फायदा होतो बरं! पण ते असो...)

तर असंच बातमी पाहता पाहता वेळ होते ती त्या debate ची... (आईशप्पथ जाम बोर होतं लोकांना टीव्ही वर भांडतांना पाहून. प्रत्यक्षातली भांडणं जास्त भारी असतात. एकदा रस्त्यावरून जाताना एक नवरा बायकोचं भांडण पाहिलं, जाम मजा आलेली... ती बाई त्या बाबाला हातात सापडेल त्याने मारत होती (दुसऱ्याच्या दुःखात आनंदी वगैरे होणाऱ्यातले नाही आपण, पण ते एकंदरीतच जाम विनोदी होतं) तो माणूस फुल्ल टुन्न होता आणि तिचा मार चुकवला कि एकदम खुश व्हायचा स्वतः वर आणि टाळी वगैरे वाजवायचा... शेवटी ती बाईच हसली याच्या अशा वागण्यावर, दमली पण होती बिचारी, शेवटी कपाळावर हात मारून निघून गेली...तर असो) अशा debate वेळी या मंडळींना जाम ऊत येतो. ते सर्व जण या debate वर ते प्रत्यक्ष घरीच चालू असल्यासाखे चवीने चर्चा करतात. आणि अशा चर्चेच्या वेळी जर कोणी चुकून घरी आलं, तर त्या व्यक्तीला सुद्धा (परीक्षेत कम्पलसरी प्रश्न असल्यासारखं) त्या चर्चेत सामील व्हावं लागतं. मधे एखादा ब्रेक वगैरे आलाच तर पाहुण्याला चहा-पाणी मिळतं, त्या वेळात त्याचं म्हणणं ऐकलं जातं आणि मग पुन्हा राष्ट्रीय कर्तव्य असल्याप्रमाणे सगळे debate वर परत भिडतात. या वेळापत्रकात कित्येक वर्षात काहीच बदल नाही. इतर लोकांच्या घरात ज्या चवीने आणि प्रेमाने सास-बहू वगैरे सिरीयल चालतात त्या प्रेमाने, त्या गोडीने, न्यूज चॅनलच्या टीआरपी ची जबाबदारी फक्त आणि फक्त यांच्या खांद्यावर असल्यासारखे हे लोक इथे न्यूज चॅनल पाहतात. (आता न्यूज चॅनल हि काय चवीने पाहायची गोष्ट आहे? एखाद्याने गोगलगाय खाऊन "वा! काय सुंदर चव आहे" असं म्हणून आयुष्यभर गोगलगाई खाण्यासारखं आहे हे ! (मला गोगलगाईची चव कशी काय माहिती? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे पण मी शुद्ध शाकाहारी आहे आणि गोगलगाय नुसती पाहून पण जाम किळस येते मला त्यामुळे ती खायला सुद्धा तशी किळसवाणीच असावी अशा पूर्वग्रहामुळे फक्त उदाहरणादाखल लिहिलं आहे. Animal rights वाल्यांनी फार मनावर घेऊ नका आम्ही (आदरार्थी अनेकवचनी)फक्त बडबड करतो.)

मी सुद्धा बातमीप्रेमी आहे काही अंशी. पण आपल्याला त्या न्यूज चॅनल्सचा जाम कंटाळा आहे राव...बरेचदा सीरिअसच असतं सगळं...सगळंच मजेशीर असावं असं आपलं(आदरार्थी अनेकवचनी! भारी वाटतं) मत नाही. पण नकारात्मक, सिरिअस पाहून पाहून डोकं पार हँग होऊन जातं. (महत्त्वाच्या बातम्या, बातम्या सांगणारे अँकर, पत्रकार वगैरे मंडळींवर अजिबात राग नाही. त्यांचं काम महत्वाचंच आहे पण एका लिमिट पेक्षा जास्त वास्तविकता पण सहन नाही होत मला. विरंगुळा हवाच आयुष्यात.) तर, उगीचच असणाऱ्या बातम्या आणि त्यांच्यावरच्या कमेंट्स वाचायला मला बरेचदा आणि फार आवडतं. आजकाल अशा बातम्या, त्यांच्या वरच्या कमेंट्स वाचणं असा छंदच जडलाय. विशेष म्हणजे अशा बातम्या असतात पण ढिगानं! ताजतवानं वाटतं अशा बातम्यांमुळे.
उदाहरण म्हणाल तर आता काही दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राच्या वेबसाईट वर दोघे पाठमोरे बसल्याचा फोटो होता. त्याचं शीर्षक असं होतं कि "हे लोकप्रिय कपल कोणतं आहे माहितेय का ?" आता हे फार साधं काहीतरी आहे असं वाटेल पण खरी गम्मत कमेंट मधे होती. त्यावरची सर्वात भारी कमेंट एकाने टाकलेली कि "ढुंगणावरून माणसे ओळखण्याइतपत इथली जनता अजून साक्षर झाली नाही. शैक्षणिक अभ्यासक्रमात या प्रगल्भ विषयाचा समावेश व्हावा." (दिवसच भारी गेला राव हे वाचून…) हे तर फक्त एकंच उदाहरण आहे. असं दररोज नवनवीन काहीतरी पाहिलं-वाचलं कि डोक्याचा बराचसा शीण नाहीसा होतो. ( अजूनच उदाहरणं म्हणाल तर - चुईंगगम चघळल्यामुळे होतं वजन कमी. कसं ते जाणून घ्या, रहस्यमय किड्याची मुंबईत दहशत, भंगारातल्या कार उडवण्याची स्पर्धा, भारताच्या विजयावर तैमूरचा जल्लोष, तैमूर माझा गोजिरवाणा वगैरे वगैरे (हो! हि मी interest घेऊन वाचलेल्या काही बातम्यांची शीर्षकं आहेत! duh!)) त्यामुळे वाटतं की कश्या का असेना बातम्या खरंच खूप आवश्यक आहेत.

(असो! अजून काही सुचत नाहीये आणि लिहून दमायला झालं आता, आता थांबतो आम्ही!(आदरार्थी अनेकवचनी))

बातमीप्रेम वगैरे काहीतरी लिहूनही हे पूर्ण वाचल्याबद्दल अभिनंदन!