तुझे आहे तुजपाशी...
क्षमता असतानाही अल्पसंतुष्ट राहणे म्हणजे आळशीपणा असा काहीसा समज असतो लोकांचा... पण क्षमता किंवा अल्पसंतुष्टी हे फार relative शब्द आहेत असं मला वाटतं. एखाद्याची क्षमता ठरवणारे आपण कोण असतो! हे ठरवणे मला योग्य वाटत नाही. तीच गोष्ट संतुष्टी ची! ह्या दोन्ही गोष्टी व्यक्तिसापेक्ष असतात. आणि प्रत्येक व्यक्ती एकाच प्रकारच्या वातावरणातून मोठा होत नसतो. त्यामुळे प्रत्येकाची संतुष्टीची व्याख्या वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, आजूबाजूची माणसं, परिस्थिती सारखी नसते आणि अशा अनेक गोष्टी माणूस घडवायला कारणीभूत असतात. प्रत्येकाची विचारसरणी सुद्धा वेगवेगळी असते. प्रत्येक जण 'टाटा' नसतो. जमिनीवर बसून केळीच्या पानावर जेवले कि news होऊन कौतुक टाटांचं होणार. मोठ्या लोकांमधला साधा माणूस हे छानच आहे. पण एखाद्या व्यक्तीने स्वतःची ऐपत नसतानाही एखाद्याला मदत केली, स्वतःच्या तोंडचा घास share केला तर त्याची न्युज होत नाही. कारण आहे पैसे आणि पॉवर... आणि ती नसूनही समाधानी असणारी माणसं क्रियाहीन, आळशी आहेत का, तर नाही... एकटीने मुक्त आयुष्य जगणं शक्य असतानाही मुलांसाठी "adjust" करणारी आई आळशी असू शकत नाही. हां पण समाधानी मात्र असू शकते! career साठी/मुळे घरी मुलांकडे लक्ष न देता आल्याने नंतर त्यांना counselling करणाऱ्या आयांपेक्षा ही "adjust" वाली आई जास्त संतुष्ट असूच शकते. मनी आणि बबड्यांचं म्हणाल तर त्यांना independent(कामाबाबतीत) राहायला शिकवलं तर निष्क्रियता येत नाही त्यांच्या पण जीवनात.
besides that, आपापली क्षमता जो तो प्रसंगांनुसार ठरवत असतो. आणि चॉईस पण असतो. काही जण क्षमता असूनही adjust करून अल्पसंतुष्ट राहायचा निर्णय घेतात आणि काही जण सर्व काही सोडून क्षमतांचा पुरेपूर वापर करून पैसा, मान, प्रतिष्ठा मिळवतात. इट्स ऑल अबाऊट चॉइसेस !
पैसा, मान, प्रतिष्ठा मिळवणारी व्यक्ती संतुष्ट असेलच असं नाही. उलट बरेचदा यासाठी तुम्हाला तुमची माणसं पणाला लावावी लागतात. एकटेपणा येतो, त्यातून नैराश्य आणि आत्महत्या वगैरे प्रकार घडतात. आपले यश/संतुष्टी पैशांवर/career growthवर अवलंबून असता कामा नये. यश /अपयश share करण्यासाठी लागतात माणसं, आपली माणसं! मग ती माणसं साधी असोत किंवा फोडणीची! वेळप्रसंगी family आणि friendsच कामी येतात. आणि त्यांच्यासाठी थोडं adjust केलं तर नक्कीच चालतं!
एखाद्याची क्षमता १०० पोरं जन्माला घालायची आहे पण तो २ वरच थांबला, अल्पसंतुष्ट राहिला तर तो आळशी आहे असा म्हणू नये. क्षमतेसोबतच आपल्याला कशामुळे संतुष्टी, शांती मिळते ते कळलं पाहिजे. आयुष्यात कुठे विश्रांती घ्यायची हे पण ठरवता आलं पाहिजे. दिवसातले २४ तास क्षमतेला upgrade करणारा पैसेवाल्या मोठ्या माणसातला साधा माणूस जर आपल्याला दिसतो तर साधारण गरजा असणारा, कष्ट करूनही सर्वांचा विचार करणारा, कधी अपेक्षेपेक्षा कमी मिळाले तरी share करूनही समाधानात राहणाऱ्या साध्या माणसातल्या "मोठा" माणसाला पण appreciate केलं पाहिजे.
काही गोष्टी फक्त क्षमता आहे म्हणून किंवा hashtags पेक्षा आपल्या आनंदासाठी पण करायच्या असतात. आपला आनंद, समाधान, संतुष्टी आपल्याच हातात असतं. समोरच्याला judge करण्यापेक्षा ते आपल्याजवळच शोधलेलं बरं! शेवटी तुकोबा म्हणतातच " तुझे आहे तुजपाशी... "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा